झाला साखरपुडा, ग बाई थाटाचा, ___रावांनी आणला, शालू जरी काठाचा
माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून, जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून
पायातल्या जोडव्यात, माहेरची स्मृती, ___ रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती
नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना, मन माझे भांबावते, ___च्या साथीने नव जीवनाचे, स्वप्न मी रंगवते
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल
सौभाग्याचे अलंकार, मंगळसूत्राचे काळे मणी, ___राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी
आरतीच्या ताटात, अगरबत्तीचा पुडा, ___रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा
हिरव्यागार मळ्यात, चंद्र दिसती तळ्यात, ___रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधते गळ्यात
प्राचीन भारतात होत्या, सोन्याच्या खाणी, ___माझा राजा, आणि मी त्याची राणी
गोऱ्या गोऱ्या हातांवरती, काढली सुंदर मेहंदी, ___रावांचे नाव घ्यायची, वारंवार लाभो संधी