पिवळं सोनं, पांढरी चांदी, ___ने काढली, माझ्या नावाची मेंदी

ताटभर दगिन्यांपेक्षा, माणसं असावीत घरभर, ___रावांचे नाव घेते, आशीर्वाद असू द्या जन्मभर

नाकात नथ, कानात कुड्या, हातात पाटल्या आणि हिरव्या बांगड्या, पायी पैंजण, बोटात जोडवी, उठून दिसते जरतारी पैठणी साडी, कपाळावर कुंकू, गळ्यात शोभे चंद्रहार, ___ रावांवर माझे, प्रेम आहे फार

चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, ___चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ

कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, ___राव माझे पती, भाग्य माझे थोर किती!

सोन्याचा मुकूट, जरीचा तुरा, ___माझी, कोहिनूर हिरा

अलंकारात अलंकार, मंगळसूत्र मुख्य, ___रावांचा आनंद, हेच माझे सौख्य

नट्टा-पट्टा करून, छान मी सजते, ____रावांचे नाव घ्यायला, भारी लाज वाटते 

मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर, __रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर

चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, __चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ