हिरवी नेसली साडी, भरला हिरवा चुडा, ___रावांचे नाव घेऊन, शोधते बर्फी की पेढा

भरजरी साडी, जरतारी खण, ___रावांचे नाव घेते, आहे___चा सण

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

बनारसी शालूला, आहेत जरतारी काठ, ___च्या मुलीच्या बारश्याचा, केला मोठा थाट

हिरवाईचा शालू नेसून, येतो श्रावण महिना, ____रावच आहेत, माझा खरा दागिना

सोन्याचे घुंगरू, चांदीच्या वाळा, सोनार घडवी दागिने, ___रावांच्या बाळा

ती आली की, पैंजण छुम-छुम वाजते, ____माझी, कित्ती गोड लाजते

लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी

पैठणीवर शोभे, नाजूक मोरांची जोडी, __मुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी

हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभते ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी