चांदीची जोडवी, सौभाग्याची खूण, ___रावांचे नाव घेते, ___ची सून
हिरव्या हिरव्या साडीचा, पिवळा काठ जरतारी, __ रावांचे नाव घेताच येई, चेहऱ्यावर तरतरी
नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा, ___ व माझा, आज आहे साखरपुडा
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज, __च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, __ रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण
लग्न लागले, घातले मंगळसूत्र, ___रावांसोबत, सुरु झाले नवे सत्र
नको मला हिरे-माणके, नको आकाशातील तारे, ___ हेच माझ्या, जीवनाचे अलंकार खरे
प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा, शोधून नाही सापडणार, ___सारखा हिरा
नील नभाच्या तबकात, नक्षत्रांचा हार, ___रावांचा स्वभाव, आहे फारच उदार
दशरथ राजाला, पुत्र होते चार, ____रावांनी घातला, मला मंगळसूत्राचा हार