छन छन बांगड्या, छुम छुम पैंजण, ___रावांचे नांव घेते, ऐका पाहू सारे जण
पूजेच्या साहित्यात, उदबत्तीचा पुडा, ____रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा
नऊवारी साडीवर, शोभून दिसते ठुशी, ____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी
हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ, ___रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ
कानी कुड्या अन हातात पाटल्या, ____रावांच्या नावानेच, प्रेमभावना मनी दाटल्या
लाल लाल मेंदी, हिरवागार चुडा, __ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा
मोत्यांची माळ, सोन्याचा साज, ___ रावांचे नाव घेते, ___ आहे आज
मंगळसूत्र हाच, सौभाग्याचा दागिना खरा, ____रावांचे नाव घेऊन, जपते मराठी परंपरा