इंग्रजी भाषेत, चहाला म्हणतात Tea, ___चे नाव घेण्यास, लागते Double fee
(देवाचे नाव) आशीर्वाद दे, येऊ दे भाग्या भरती, ___रावांच्या उत्कर्षाची, कमान राहू दे चढती!
योगामुळे मिळविले, डायबिटीस वर नियंत्रण, __शी भांडण म्हणजे, high BP ला निमंत्रण
अंधश्रद्धेचा पाश, करी जीवनाचा नाश, ___चे नाव घेतो तुमच्यासाठी खास
डासामुळे होतो, डेंगू आणि मलेरिया, ___ला पहिल्यांदा बघताच, झाला मला लवेरिया
___भेटल्यापासून, झालो मी पूर्ण, पोटांच्या तक्रारीसाठी, आजच घ्या कायम चूर्ण
अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण झाले सारथी, ___राव माझे, आहेत फार निस्वार्थी
Exams मध्ये व्हायचो, मी चांगल्या नंबराने पास, __ला भरवतो, __चा घास
उखाणा घेते मी, खूपच Easy, ___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy
चांदीच्या ताटात, __चे पेढे, __माझे हुशार, बाकी सगळे वेडे!