गोपिकांना करते धुंद, कृष्णाची बासरी, ___ रावांचे नाव घेते, ___ (पूजेचे नाव) आहे सासरी
कृष्णाच्या गायींना चरायला, हिरवे-हिरवे कुरण, ___रावांचे नाव घ्यायला, _____पूजेचे कारण
कृष्णाच्या बासरीने होती, गोपिकांची मने घायाळ, __ रावांची दाढी म्हणजे, सिंहाची जणू आयाळ
द्वारकेत कृष्ण, अयोध्येत राम, ___रावांचे चरण, हेच माझे चारही धाम
राधेशिवाय कृष्णाला, उरणार नाही अर्थ, ___शिवाय माझं, जीवनच व्यर्थ
अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण झाले सारथी, ___राव माझे, आहेत फार निस्वार्थी
कृष्णाच्या रंगात, राधिका न्हाली, ___रावांना घास भरवताना, खूपच मज्जा आली
श्रीकृष्णाच्या बाललीला, यशोदेला सोडतात हसवून, ___ला नेईन फिरायला, विमानामध्ये बसवून
मी सावळा ग कान्हा, तुझं अप्सरेच रूप, ___वर मी मनापासून, प्रेम करतो खूप
यमुनेच्या डोहात, कृष्ण वाजवितो पावा, ___रावांचा आणि माझा, संसार सुखाचा व्हावा