मथुरा नगरी झाली दंग, पाहून कृष्णाची खोडी, ___रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी?

कृष्णलीलेत, राधिका गेली न्हाऊन, ___रावांचे नाव घेते, सर्वांकडे पाहून

श्री कृष्णाचे नाव घेतले, की आठवते लगेच बासरी, ___राणी माझी, आहे एकदम हसरी

कृष्णाच्या बासरीचा, राधेला लागला ध्यास , ___ला भरवितो मी, ___चा घास

देवाजवळ करतो, ___ची आरती, ___आहे माझ्या, जीवनरथाची सारथी 

गुलाबाचे फूल, मधोमध असते पिवळे, ___राव आहेत, कृष्णा सारखे सावळे

द्वारकेत श्रीकृष्ण, अयोध्येत राम, ___रावांच्या सेवेमध्ये, मला मिळती चारही धाम

अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण सारथी, ____रावांचे नाव घेऊन, करते ____ ची आरती

__च्या देवळाला, सोन्याचा कळस, __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस

__च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा, __रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा