निसर्गाचे सारे रंग, भरलेत तुझ्यात देवाने, ___ घरी आली, लक्ष्मी या रूपाने

प्रीतीच्या फुलांचा, कसा गंध सांगू, ___राव मिळाले, देवाकडे आणखी काय मागू?

भक्ती तेथे भाव, भाव तेथे कविता, ___च्या नावाचा, जप करतो येता-जाता

पोटभर जेवण झाल्यावर, विसरू नका खायला पान, ___ला पाहिल्यावर, हरवून गेल माझं भान

चकोराला असते, चांदण्याची आस, __रावांना देते, __चा घास

माझी आणि ___ची, जमली आता जोडी, अशीच राहो नेहमी, प्रेमाची ही गोडी

साखरपुडा झाला आता, नव्या संसाराची लागली चाहूल, ___रावांच्या प्रीतीसंगे, सुखसागरात ठेवते पाऊल

___चौपाटीवर बसून, समुद्राची बघायला आवडते लाट, ___आपल्या लग्नाची, खूप बघतोय मी वाट

साखरपुड्याच्या दिवशी, प्रीती मनी दाटली, लाजत बुजत___रावांना, अंगठी मी घातली

प्रेमरूपी दिव्यात लावते, प्रीतिची वात, ___रावांचे नाव घ्यायला, केली आजपासून सुरुवात