मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, __तू फक्त, मस्त गोड हास

___च्या काठावर, सुंदर माझे गाव, ___च्या मेंदीत, लपले माझे नाव

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती, अशीच राहू दे, माझी व ___ रावांची प्रेम ज्योती

जीवनाच्या सागरात, सप्तरंगी पूल प्रेमाचा, ___रावांच्या साथीने, संसार करीन सुखाचा

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ___रावांचे नाव येते, थेट माझ्या हृदयातून

पाच वर्षांचा संसार, पण प्रत्येक दिवस गोड, तिन्ही सांजेला मनाला लागे, ___रावांची ओढ

पोर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजरा, ___रावांनी आणला मला, मोगऱ्याचा गजरा

काळोखी रात्र संपली, धावत आली उषा, ___च्या सहवासात, प्रीतीची चढली नशा

स्थळं आली होती खूप, पण थांबलो होतो तुझ्या होकारासाठी, ___सोबत अखेर जुळल्या, माझ्या रेशीमगाठी

फुलांइतकीच सुंदर दिसते, गुलाबाची कळी, हसल्यावर ___च्या गालावर, दिसते सुंदर खळी