पौर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजिरा, ___वर शोभून दिसतो, सुगंधी मोगऱ्याचा गजरा

नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे, ___चे रूप, आहे खूपच देखणे

स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून,  __रावांचे नाव घेते, त्यांच्याच बाजूला बसून

गालावर खळी, डोळ्यात धुंदी, __मुळे झाले, आयुष्य सुगंधी

पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी, __मुळे झाले, जीवन सुगंधी

गोड गोड पुरणपोळीवर, घ्यावे भरपूर तूप, __वर माझे, प्रेम आहे खूप खूप

गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद, __च्या नावातच, सामावलाय माझा आनंद

झाले आता वय, जवळ आली साठी,  शंभरी नक्की गाठेन, __चे प्रेम असता पाठी

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने, __च्याच प्रेमात पडतं

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त, _च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त