प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी, आज भरवते__ला, गोड गोड बासुंदी

बाजारातून घेऊन येतो भाजी ताजी ताजी, __शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी

संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी, __रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी

प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा, शोधून नाही सापडणार, ___सारखा हिरा

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल, __च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल, __ माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल!

वयामुळे थकले अंग, तरीही मन ताजे,  __माझी राणी आणि आम्ही तिचे राजे

लाल लाल मेंदी, हिरवागार चुडा, __ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा

नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून, __रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून

गुलाबाचे फूल, वाऱ्यावर लागते डुलू, दिवसभर सुरु असते, ___ चे गुलूगुलू