हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना, ___रावांना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वराला प्रार्थना
शंकरासारखा पिता, पार्वतीसारखी माता, ___राणी मिळाली, स्वर्गसुख आले हाता
भोळ्या शंकराला, बेलाची आवड, ___रावांची पती म्हणून, केली मी निवड
गणपती बाप्पा आहेत, शंकर-पार्वतीचे सुपुत्र, ___रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र
शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला, ____रावांचे नाव घेते, सगळे आहेत साक्षीला
पार्वतीने नवस केला, पती मिळावा भोलेनाथ, ___रावांची मिळो मला, जन्मोजन्मी साथ
शंकराच्या पिंडीला, नागदेवतेचा वेढा, ____राव व माझा, शोभून दिसतो ना जोडा?
महादेवाच्या डोईवर, चंद्राची कोर, ____रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर
___देवा / देवी, करते मी तुझी भक्ती, ___रावांसोबत राहू दे, तुझ्या आशीर्वादाची शक्ती