शंकराच्या जटांमध्ये, पवित्र गंगेला स्थान, ____रावांमुळे मिळाला, मला सौभाग्याचा मान 

महादेवाची मनोभावे, सेवा करतो नंदी, ____रावांच्या प्रेमामुळेच तर, रंगते माझी मेंदी

__च्या देवळाला, सोन्याचा कळस, __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस

__च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा, __रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा 

शंकराच्या पिंडीला, नागाचा वेढा, __ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा

___ च्या आशीर्वादाने, आला भाग्याचा दिवस, ___रावांसाठी, मी केला होता नवस

मनाच्या गाभाऱ्यात, __ची मूर्ती, अशीच वाढत राहो देवा, __रावांची कीर्ती

शंकराच्या पिंडीवर, बेलाचे पान, __रावांचे नाव घेते, राखून सर्वांचा मान Shankarachya pindivar, belache pan, ___ravanche nav ghete, rakhun sarvancha maan

शंकराला बेल, विष्णूला तुळस, __रावांचे नाव घ्यायला, कसला हो आळस! Shankarala bel, Vishnula tulas, ___ravanche nav ghyayala, kasala ho alas!

हिमालय पर्वतावर, शंकर-पार्वतीची जोडी, __रावांमुळे आली, आयुष्याला गोडी  Himalay parvatavar, Shankar-Parvatichi Jodi, ___raavanmule aali, ayushyala godi