सासू माझी प्रेमळ, सासरे माझे हौशी, मिळून मिसळून राहतो, आनंदाने प्रत्येक दिवशी

___ची सून म्हणून घरात आले, पण सासूबाईंनी तर मला त्यांची लेकच केले

वडिलांची माया, आणि आईची कुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

सासर आहे छान, सासू आहे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

सासूबाई आहेत सुगरण, सासरेबुवा आहेत हौशी, ___चे नाव घेते, ___ पूजेच्या दिवशी

____ची मुलगी झाली, ____ची सून, सासूबाईंना मानते आई, अगदी मनापासून

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी.

अंगणातल्या तुळशीला घालते, पळी पळी पाणी, आधी होते आई वडीलांची तान्ही, आता झाले ___रावांची राणी

लग्न झाल्यावर मुलगी होते, माहेरची पाहुणी, ___रावांच्या घराची, झाले मी गृहिणी

माहेरी साठवले, मायेचे मोती, __च नाव घेऊन, जोडते नवी नाती