बहिणीसारख्या नणंदा, भावासारखे दीर, ___रावांचे नाव घ्यायला, झाले मन अधीर

पायातल्या जोडव्यात, माहेरची स्मृती, ___ रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती

माहेरची नाती, जणू रेशमाच्या गाठी, रेशीमबंध सोडून सासरी आले, ___च्या साठी

सासरचे निरांजन, माहेरची फुलवात, __रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, ___रावांशी लग्न करुन, सौभाग्यवती झाले

लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर, ___ व माझ्या लग्नाला आलात, हाच आमचा आहेर

बकुळीची फुले सुकली तरी, हरवत नाही गंध, ___रावांसाठी माहेर सोडले तरी, राहतील मनात स्मृतिबंध

आई वडीलांच्या वियोगाचे, दुःख ठेवून मनात, हसतमुखाने प्रवेश केला मी, ___रावांच्या जीवनात

लेक कोणाची, ___ (माहेरचे आडनाव) ची, सून कोणाची, ___ (सासरचे आडनाव) ची, राणी कोणाची, ___ (पतीचे नाव) रावांची

चंद्र मराठीत, चाँद हिंदीत, इंग्रजीत म्हणतात मून, ___रावांचे नाव घेते, मी ___ ची सून