सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा, ___रावांमुळे लागला, मला त्याचा लळा
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, __रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने
मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर, __रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर
आई बाबांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस, __च नाव घ्यायला, मला येते फारच मौज
आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, __सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम
सासरची छाया, माहेरची माया, __ राव आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया
माहेरच्या आठवणीने, डोळे झाले ओले, __रावांच्या प्रेमाने, अश्रूंची झाली फुले
__ची लेक झाली, __ ची सून, __ च नाव घेते, गृहप्रवेश करून!
सासरी आले तरी, माहेरचे विसरता येत नाही अंगण, ___रावांचे नाव घेऊन, सोडते मी कंकण
माहेर सोडताना, पावलं झाली कष्टी, __रावांच्या संसारात, करेन सुखाची वृष्टी