इंग्रजी भाषेत, गवताला म्हणतात ग्रास, सासूबाई देतात मला, लई लई त्रास

घरातील सर्वांवरच, अथांग तुमची माया, आयुष्यभर घरच्यांसाठी, ___नी झिजवली काया

___ची सून म्हणून घरात आले, पण सासूबाईंनी तर मला त्यांची लेकच केले

सासू सुनेच्या भांडणात नवऱ्या मुलाची होते दैना, आणि सासू नाही भांडली तर, मला चैन च पडेना

सासर आहे छान, सासू आहे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

सासूबाई आहेत सुगरण, सासरेबुवा आहेत हौशी, ___चे नाव घेते, ___ पूजेच्या दिवशी

कधीच नाही पडले, चिंतेचे ऊन, सासूबाईंनी घेतले, नेहमीच मला समजून

आई सारखी मिळाली, प्रेमळ सासू, या वयातही दिसते एकदम ढासू

मराठी सासूला मिळाली, मारवाडी सून, चुकलं माझं काही, तर घ्या जरा समजून

कडू कडू कारलं, सासूबाईला चारलं, ___रावांसोबत बघते, कटप्पाने बाहुबलीला का बरं मारलं?