यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली, ___रावांची आई जशी, माझी दुसरी माऊली
____च्या घरात, आता झालेय मी सेट, माझ्याशी जुळवून घेणाऱ्या, सासू बाई खरंच ग्रेट
आई सारखी सासू मिळाली, भाग्य माझे मोठे, त्यांच्या मायेच्या छायेत, सगळे प्रॉब्लेम्स होती छोटे
____ची मुलगी झाली, ____ची सून, सासूबाईंना मानते आई, अगदी मनापासून
मोत्याची माळ अन् हिऱ्यांचा हार, सून माझी वेडी अन् मीच आहे हुशार
रंगात रंग, लाल चुटुक रंग, सुनबाई माझी नेहमी, whatsapp मध्ये दंग
लग्नानंतर मिळाली, मला जशी दुसरी आई, ___ माझ्या आहेत, सगळ्यात बेस्ट सासूबाई
टेरीकोटच्या शर्टाला, कॉटनचा खिसा, नाही ऐकणार जा सासूबाई, कितीही बोंबलत बसा
चित्रपटात सासू करते, नेहमीच सूनेचा छळ, जरा त्रास दिला मी तर, काढा की थोडी कळ
माहेर सोडलं मायेचं, आता रडू की हसू, आई सारख्या मायेची, लाभली मला प्रेमळ सासू