माझी आणि ___ची, जमली आता जोडी, अशीच राहो नेहमी, प्रेमाची ही गोडी

आकाशात चमकतात, चंद्र आणि तारे, ___रावांसाठी, सोडून आले मी सारे

माहेरी साठवले, मायेचे मोती, __च नाव घेऊन, जोडते नवी नाती

गुलाबाचे फूल, मोहक आणि ताजे, __च्या येण्याने, भाग्य उजळले माझे

आपला आशीर्वाद,आहे लाख मोलाचा, __रावांसोबत, संसार करेन सुखाचा

वसंतात दरवळतो, फुलांचा सुवास ___सोबत सुरु केला, मी जीवनाचा प्रवास

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, __तू फक्त, मस्त गोड हास

नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा, __रावांसोबत, संसार करीन सुखाचा

सासरचे निरांजन, माहेरची फुलवात, __रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल