आरतीच्या ताटात, अगरबत्तीचा पुडा, ___रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा

___च्या काठावर, सुंदर माझे गाव, ___च्या मेंदीत, लपले माझे नाव

परातीत परात, चांदीची परात, ___ची लेक आली, ___च्या घरात

वटपौर्णिमेला भरते, सुवासिनींची ओटी, ___रावांचे नाव, सदा माझ्या ओठी

जुईची वेणी, जाईचा गजरा, ___वरती, सगळ्यांच्या नजरा

जेवणात हवे दही, साखर, तूप, ____ मला आवडते खूप

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात, __ भरली, माझ्या मनात

पिवळं सोनं, पांढरी चांदी, ___ने काढली, माझ्या नावाची मेंदी

नाजूक अनारसे, तळले तुपात, काहीतरी जादू आहे, ___च्या रूपात

गोल गोल गरागरा, फिरतो भोवरा, ___च नाव घेतो, तिचा प्रेमळ नवरा