डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी, __माझी झाल्यापासून, जळतात बघा सारी
शंकराच्या पिंडीला, नागाचा वेढा, __ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा
श्रावणात असतो, रोज नवीन सण, ___ला सुखी ठेवण्याचा, घेतलाय मी पण
उखाणा घेते मी, खूपच Easy, ___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy
चांदीच्या ताटात, __चे पेढे, __माझे हुशार, बाकी सगळे वेडे!
उगवला सूर्य, मावळला शशी , ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
__च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट, __ला पाहून, पडली माझी विकेट!
कपाळाचं कुंकू, जसा सूर्याचा ठसा, ___रावांचे नाव घेते, सारे जण बसा
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, __ रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण
लग्न लागले, घातले मंगळसूत्र, ___रावांसोबत, सुरु झाले नवे सत्र