__व __च्या लग्नाकडे, डोळे लागले जगाचे, आहेरात आणा फक्त, अनमोल गिफ्ट आशीर्वादाचे 

लग्नकार्य म्हणजे, सुख-आनंदाची सभा, तुमच्या येण्यानं वाढेल, समारंभाची शोभा 

__व __ची जुळणार, जन्मोजन्मीची नाती, उपस्थित राहून उधळा, आपल्या आशीर्वादाचे मोती

__आणि__चे जुळले आता सूर, तुमच्या येण्यानं होईल, आनंद भरपूर!

तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी, नक्की या जुळताना, ___ आणि __ च्या रेशीमगाठी 

लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर, तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर

आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात, __आणि__वर असू द्या, आशीर्वादाचा हात 

__ आणि __ ची जमली आता जोडी, लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी 

यंदा घातलाय आमच्या___च्या लग्नाचा घाट, उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट