उखाणे संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions (FAQs) About Ukhane
उखाणे म्हणजे काय? | What are Ukhane?
उखाणा म्हणजे हलक्या-फुलक्या आणि काव्यात्मक पद्धतीने यमक जुळवून जोडीदाराच्या नावाचा चतुराईने वापर करून बनवलेली छोटीशी २ ओळींची कविता किंवा चारोळीच समजा ना!
उखाणे घेणे ही मराठी विवाहसोहळे आणि अन्य सण-समारंभांशी जोडली गेलेली एक गमतीदार व लाडकी परंपरा आहे.
उखाणे का घेतात? | Why do we take Ukhane?
आजकालच्या तरुण पिढीला हे पचवायला नक्कीच जड जाईल, पण पूर्वीच्या काळी पत्नीने पतीचे नाव घेणे अशुभ / असंस्कृतपणाचे लक्षण मानले जायचे. त्यामुळे चारचौघांमध्ये सोडाच, पण घरातही सगळीकडे केवळ ‘अहो’ चाच जप व्हायचा. जसे… ‘अहो, ऐकलंत का?’
त्यामुळे लग्नकार्य व इतर समारंभांच्या वेळी उखाण्यांच्या रूपात पती-पत्नीला एकमेकांचे नाव सर्वांसमोर घेण्याची दुर्मिळ संधी मिळत असे.
आता मात्र बऱ्याचशा ठिकाणी हे ‘अहो’ हळूहळू out of fashion झालंय. अहो ची जागा आता ‘बेबी’, ‘शोना’, ‘बाबू’ किंवा सरळ नावाने घेतलीये.
त्यामुळे उखाणे घेणं या परंपरेमागचा मूळ हेतू हरवला असला तरी त्यातली मजा मात्र अजूनही कायम आहे. आणि म्हणूनच, आजही सर्व लग्न आणि सण – समारंभांमध्ये उखाण्यांना खूप महत्व आहे.
उखाण्यांची परंपरा किती जुनी आहे? How old is the tradition of Ukhanes?
उखाणे मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. उखाण्यांचा वापर नक्की कधी सुरु झाला हे निश्चितपणे सांगणे तसे कठीणच. परंतु त्यांची पाळंमुळं मराठी संस्कृती आणि इतिहासात खोलवर रुजलेली आहेत हे मात्र नक्की.
उखाणे कोणत्या प्रसंगी घेतले जातात? On which occasions are Ukhane used?
उखाणे मुख्यतः खालील प्रसंगी घेतले जातात:
- लग्न समारंभ व अन्य विधी (साखरपुडा, घास भरवणे, लग्नविधी, गृहप्रवेश)
- सण व पूजा (सत्यनारायणाची पूजा, मंगळागौर, वटपौर्णिमा, दिवाळी-पाडवा)
- बाळाच्या जन्मानंतरची शुभकार्ये (डोहाळे जेवण, बारसे, मुंज)
- कुटुंबातील गेट-टुगेदर किंवा मजा-मस्तीच्या प्रसंगी
उखाणे कसे घेतले जातात? How are Ukhane recited?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी (___) तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचं.
आता खालील उखाणा तुम्ही कसा घेऊ शकता ते बघूया.
गरम गरम ब्रेड वर, वितळते जसे बटर,
___ला पाहताक्षणी, उघडले मनाचे शटर
जर तुमच्या जोडीदाराचे नाव माधुरी असेल, तर मग तुम्ही ___ च्या जागी तिचे नाव घ्यायचे.
गरम गरम ब्रेड वर, वितळते जसे बटर,
माधुरीला पाहताक्षणी, उघडले मनाचे शटर
आहे की नाही सोपं?
उखाण्यात नाव घेणे अनिवार्य आहे का? Is it mandatory to mention a name in Ukhane?
उखाण्याचा मूळ हेतूच नाव घेणे हा असल्यामुळे नावाशिवाय उखाण्याला मजा तरी कशी येणार? त्यामुळे उखाणे आले की त्यात नाव घेणे ओघाने आलेच. तरीही काही मोजके उखाणे याला अपवाद असू शकतात.
उखाणे फक्त पती-पत्नींनाच घेता येतात का? Are Ukhane only for husband and wife?
बहुतांश प्रसंगी पती-पत्नी अथवा जोडीदारच एकमेकांच्या नावाचे उखाणे घेताना दिसले तरी, काही खास प्रसंगी गंमत म्हणून सासू-सासरे, मित्र-मैत्रिणी, मुलं-मुली आणि भावंडं यांचेही नाव घेता येऊ शकते.