पैशाच्या श्रीमंतीपेक्षा, मनानी असावे श्रीमंत, ___रावांचे नाव घेते, आज आहे मकर संक्रांत

मकर संक्रांतीच्या निमित्ताने, हळदी कुंकूवाचा घातला घाट, आमच्या ___रावांचा आहे, एकदम राजेशाही थाट

तिळासारखा स्नेह आणि गुळासारखा असावा गोडवा, ___रावांचे नाव घेत, सुखी संसाराचा मागते जोगवा

आयुष्याच्या करंजीत, प्रेमाचे सारण, ___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाचे कारण

हळदी कुंकवानिमित्त, दरवळला अत्तराचा सुगंध, ___रावांचे आणि माझे आहेत, जन्मोजन्मींचे दृढ बंध

चांदीच्या दिव्यात लावली, तुपाची वात, ___रावांचे नाव घेत करते, हळदी कुंकवाला सुरूवात

संक्रांतीला लुटावे, तिळगुळाचे वाण, ___रावांमुळे मिळाला मला, सौभाग्याचा मान

संक्रांतीच्या दिवशी देते, तीळ आणि गूळ, ___राव आहेत माझ्या, सुखी संसारवेलीचे मूळ

हळदी कुंकुवासाठी, जमल्या साऱ्या बायका, ___रावांचे नाव घेते, सर्वानी नीट ऐका

काकवी पासून, बनवतात गूळ, ___रावांचे नाव घेऊन, वाटते मी तिळगूळ