सोसाट्याच्या वाऱ्याने, सगळीकडे उडते धूळ, ___रावांचे नाव घेऊन, संक्रांतीला वाटते तिळगूळ

तिळगुळाच्या देवघेवीने, दृढ प्रेमाचं जुळलं नातं, ___रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत

तिळासोबत गुळाचा, गोडवा किती छान, ___रावांचे नाव घेऊन, देते संक्रांतीचे वाण

तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी, ___रावांचे नाव घेते, सुखी राहो आमची जोडी

तिळाचा हलवा, चांदीच्या वाटीत, ___रावांचे प्रेम, हेच माझ्या सुखाचे गुपित

स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी, ___ रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

सेकंड इनिंग मध्ये करतोय आम्ही, World Tour च प्लॅनिंग, ___मुळे मिळालं माझ्या, आयुष्याला Meaning

आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो, तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो

रोज सकाळी उठून, पितो भरपूर पाणी, __च्या सोबत गातो, आनंदाने गाणी