छान बनवतो नाक्यावरचा, अण्णा इडली डोसा, ___राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा

प्रत्येक नाक्यावर मिळते, सिगरेट आणि चहा ची टपरी, ___राव आहेत, एक नंबर चे छपरी

जरीची साडी नेसलीस की, दिसतेस खूपच सुंदर, करीना , कतरिना राहिल्या मागे,  ___चाच पहिला नंबर

लग्नाची ठरली तारीख, हॉलचंही केलं बुकिंग, ___च मात्र कधीपासून, संपतच नाहीये शॉपिंग

प्रेमाच्या प्रवासात, पास केल्या सर्व टेस्ट, सर्व विषयांत ___ला, मार्क्स मिळाले बेस्ट 

क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारली Six, ___ला केलं, मी सात जन्मांसाठी Fix

पाण्यात घागर बुडताना, आवाज येतो बुडबुड, ___आणि माझ्या Life मध्ये, नको कुणाची लुडबुड

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले, घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले

शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन, __चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन