पाहताच___ला, जीव झाला वेडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा

उन्हाळ्यात हवा, गार गार ऊसाचा रस, __चाच विचार, माझ्या मनी रात्रंदिवस

खेळत होतो PUBG, आला ब्लू झोन, ___चं नाव घेतो, शोधून सेफ झोन

कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम, __च्या हातचं जेवण, आवडते मला जाम

मुरेल तितका होतो Tasty, प्रेमाचा मुरांबा, ___ चिडते तेव्हा भासते, ditto जगदंबा 

रिलेशनशिप मध्ये असताना, केले खूप वादे, ___राव आहेत लबाड, फक्त चेहऱ्याने दिसतात साधे

गच्चीवर गच्ची, सिमेंटची गच्ची, ___माझी बायको, आहे मोठी लुच्ची

कोपऱ्यात रूसून बसले होते, पैठणी साठी खास, ___नी उघडली खिडकी, आणि आत घुसले डास

सोसता सोसेना, हा संसाराचा ताप, ___राव अजूनही सुधारले नाहीत, होऊन २ मुलांचे बाप

काचेच्या ग्लासात, गुलाबी सरबत, ___राव गेले कामाला, की मला नाही करमत