काश्मीरहून आणलाय, सुंदर रेशमी रुमाल, ___ बरोबर असले की, कशाला हवा हमाल?
___भेटल्यापासून, झालो मी पूर्ण, पोटांच्या तक्रारीसाठी, आजच घ्या कायम चूर्ण
जुन्या भिंतीवर लावलं, नवीन नवीन कॅलेंडर, __रावांचे पोट म्हणजे, भरलेले गॅस सिलेंडर
मोगऱ्याच्या झाडावर, फुलल्या होत्या कळ्या, __रावांचे दात म्हणजे, मोडक्या दरवाज्याच्या फळ्या
विड्याच्या पानात, पावशेर कात, __रावांच्या कमरेत, घातली गाढवाने लाथ
बिर्याणी हवी सारखी, नको वरण भात, __च्या हॉटेल प्रेमाने, पोटाची लागलीये वाट
माझं नाव घेताना __करते Blush, Life मधले Tensions सारे, होणार आता Flush
माझ्या Life मध्ये, __भेटली Luckily, कोणी काही बोलले तर, करते माझी वकिली
उन्हाळ्यात अंगाला, घाम येतो फार, आंघोळ कर__, नाहीतर लोकं होतील पसार
__व माझी Lovestory एकदम सच्ची, गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची