इंग्रजी भाषेत, चहाला म्हणतात Tea, ___चे नाव घेण्यास, लागते Double fee

दही चक्का तूप, ___आवडते मला खूप

तांदूळ निवडताना, मिळतात खूप खडे, ___रावांना आवडतात, गरमागरम बटाटे वडे

गोड गोड पुरणाच्या पोळीवर, मस्त लागते तूप, सासूबाई तुम्ही रहा निश्चिंत, ___ वर प्रेम करणार मी खूप

गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज, ___रावांच्या बाळाची, आज आहे मुंज

वटपौर्णिमा आहे, सुवासिनींसाठी मोठा सण, ___रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन

मंगळागौरीला वाढलाय, पावसाचा जोर, ___रावांचे नाव घेते, भाग्य माझे थोर

आनंदाचे कारंजे, मनी उडते थुई थुई, ___रावांच्या बाळाची, आता होणार मी आई

डोहाळे जेवणाला सजवली, पाना फुलांची नौका, ___रावांचे नाव घेते, लक्ष देऊन ऐका

वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते, ___रावांचे नाव घेऊन, सौभाग्याचा आशीर्वाद मागते