लग्नाच्या पंगतीत, उखाणा घेतो खास, हळू खा ___, घशात अडकेल ना घास
___च्या देवळात, धुपाचा वास, ___ला भरवतो, ___चा घास
सर्वांच्या आग्रहाखातर, भरवते पुरी श्रीखंड, ___च्या साठी मी, सोडून चालले आशिया खंड
कृष्णाच्या रंगात, राधिका न्हाली, ___रावांना घास भरवताना, खूपच मज्जा आली
भाद्रपद महिन्यात, गणपती बसवितात शाडूचा, ___ला प्रेमाने, घास भरविते लाडूचा
शिमला म्हैसूर उटी, म्हणशील तिथे जाऊ, प्रेमाने भरवतो घास ___, बोटं नको चावू
गावठी गुलाबाला येतो, अप्रतिम सुवास, ___रावांना भरवते, ___चा घास
ताटाभोवतीची रांगोळी, सांगते काही खास, ___रावांना भरवते, ___चा घास
फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे, ___रावांच्या बाळाचे, आज आहे बारसे
पहिल्या वर्षी वटपूजा, थाटामाटात केली, रूप पाहून माझे, ___रावांची स्वारी खुश झाली