श्रीकृष्णाच्या बाललीला, यशोदेला सोडतात हसवून, ___ला नेईन फिरायला, विमानामध्ये बसवून
हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, ___रावांचे चरण, हेच माझे चारधाम
गणपती बाप्पा सर्वांच्या, पूर्ण कर हो इच्छा, आणि ___रावांवर वर्षू द्या, तुमचे प्रेम आणि शुभेच्छा
शंकरासारखा पिता, पार्वतीसारखी माता, ___राणी मिळाली, स्वर्गसुख आले हाता
मी सावळा ग कान्हा, तुझं अप्सरेच रूप, ___वर मी मनापासून, प्रेम करतो खूप
निसर्गाचे सारे रंग, भरलेत तुझ्यात देवाने, ___ घरी आली, लक्ष्मी या रूपाने
घरी बघण्यासाठी आली होती, ___(सासरचे आडनाव)ची स्वारी, ___रावांसोबत करेन आता, पंढरीची वारी
यमुनेच्या डोहात, कृष्ण वाजवितो पावा, ___रावांचा आणि माझा, संसार सुखाचा व्हावा
प्रीतीच्या फुलांचा, कसा गंध सांगू, ___राव मिळाले, देवाकडे आणखी काय मागू?
मथुरा नगरी झाली दंग, पाहून कृष्णाची खोडी, ___रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी?