पारिजताकाच्या झाडाखाली, हरीण घेते विसावा, ___रावांच्या पाठीशी, सदैव परमेश्वर असावा

घराला अंगण, अंगणात पवित्र तुळस, ___रावांच्या आयुष्यात, चढवीन आनंदाचा कळस

अंगणातल्या तुळशीला घालते, पळी पळी पाणी, आधी होते आई वडीलांची तान्ही, आता झाले ___रावांची राणी

कृष्णलीलेत, राधिका गेली न्हाऊन, ___रावांचे नाव घेते, सर्वांकडे पाहून

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, दशरथाला पुत्र चार, ___रावांनी घातला मला, मंगळसूत्राचा हार

फुलांच्या बागेत, फुलली मोहक शेवंती, ___राव सुखी राहावेत, हीच परमेश्वराला विनंती

भोळ्या शंकराला, बेलाची आवड, ___रावांची पती म्हणून, केली मी निवड

श्री कृष्णाचे नाव घेतले, की आठवते लगेच बासरी, ___राणी माझी, आहे एकदम हसरी

जास्वंदीच्या फुलात शोभे, गणपतीची मूर्ती, अशीच वाढत राहो, ___व माझी प्रीती

भक्ती तेथे भाव, भाव तेथे कविता, ___च्या नावाचा, जप करतो येता-जाता