__च्या दिवशी, मस्त जमली पंगत,  __ला घास भरवून, वाढवतो मी रंगत

मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रुपाचा, __रावांना घास भरविते, गोड गोड __चा

आजच्या सोहळ्याचा, थाट केलाय खास, __ला भरवतो, __चा घास

रंगांची उधळण करत, आली आता होळी, __ला भरवतो, तिचीच पुरणपोळी

अगं अगं __, खिडकीत आला बघ काऊ, घास भरवतो__चा, बोटं नको चाऊ

एक होती चिऊ आणि एक होता काऊ, __ला भरवलं तर, मी काय खाऊ? 

चांदीच्या ताटात, __ चा हलवा, __ रावांचे नाव घेते, सर्वांना बोलवा

जेवणाच्या पंगतीत, उखाणा घेते खास, __रावांना देता देता, __चा घास

__ला भरवण्यात, येतो आनंद आगळा, घे पटकन नाहीतर, मी फस्त करेन सगळा

चांदीच्या ताटात, पक्वान्नांची रास, __रावांना देते, __चा घास