गुलाबाचे फूल, मधोमध असते पिवळे, ___राव आहेत, कृष्णा सारखे सावळे

देवळाला खरी शोभा, कळसामुळे येते, ___मुळे माझे, गृहसौख्य दुणावते

कोरा कागद, निळी शाई, रोज देवळात जाण्याची,___ला असते घाई

कमळात उभी लक्ष्मी, मोरावरती सरस्वती, ___रावांचे नाव घेते, खरी मी भाग्यवती

द्वारकेत श्रीकृष्ण, अयोध्येत राम, ___रावांच्या सेवेमध्ये, मला मिळती चारही धाम

पार्वतीने नवस केला, पती मिळावा भोलेनाथ, ___रावांची मिळो मला, जन्मोजन्मी साथ

अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण सारथी, ____रावांचे नाव घेऊन, करते ____ ची आरती

शंकराच्या पिंडीला, नागदेवतेचा वेढा, ____राव व माझा, शोभून दिसतो ना जोडा?

महादेवाच्या डोईवर, चंद्राची कोर, ____रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर

___देवा / देवी, करते मी तुझी भक्ती, ___रावांसोबत राहू दे, तुझ्या आशीर्वादाची शक्ती