शंकराच्या जटांमध्ये, पवित्र गंगेला स्थान, ____रावांमुळे मिळाला, मला सौभाग्याचा मान 

महादेवाची मनोभावे, सेवा करतो नंदी, ____रावांच्या प्रेमामुळेच तर, रंगते माझी मेंदी

__च्या देवळाला, सोन्याचा कळस, __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस

देवळावर चढवला, कळस सोन्याचा, __राव म्हणजे, नवरा माझा नवसाचा

डास चावला की, येते अंगाला खाज, __चे नाव घेतो, तुमच्यासाठी आज

पन्नाशी झाली, साठी झाली, आली आता सत्तरी, वय झाले, आता तरी थांबवा, तुमची चेष्टा- मस्करी

लवकरच येईल आता, मंगळसूत्र कंठी, त्याआधी घालून घेते, ___ रावांना अंगठी

माझी आणि ___ची, जमली आता जोडी, अशीच राहो नेहमी, प्रेमाची ही गोडी

खजूर असतो मऊ, आणि कडक असते खारीक, झाला साखरपुडा ___संगे, आता येऊ दे लवकरच लग्नाची तारीख

साखरपुडा झाला आता, नव्या संसाराची लागली चाहूल, ___रावांच्या प्रीतीसंगे, सुखसागरात ठेवते पाऊल