साखरपुडा झाला, आता पडतो सर्वांच्या पायी, ___रावांना लग्न करण्याची, झाली आहे खूप घाई
___चौपाटीवर बसून, समुद्राची बघायला आवडते लाट, ___आपल्या लग्नाची, खूप बघतोय मी वाट
नाण्याच्या दोन बाजू, छापा आणि काटा, ___रावांसोबत साखरपुडा झाला, आता पेढे वाटा
भरजरी हिरवी साडी नेसून, हातात घातली रिंग, मी आजपासून क्वीन, आणि ____माझे किंग
झाला साखरपुडा, ग बाई थाटाचा, ___रावांनी आणला, शालू जरी काठाचा
विडा, सुपारी, फुले, पेढे आणि साखरेने भरले ताट, ___रावांनी अंगठी घालून केली, साखरपुड्याची सुरवात
साखरपुड्याच्या दिवशी, प्रीती मनी दाटली, लाजत बुजत___रावांना, अंगठी मी घातली
साखरपुडा झाला आज, आता लग्न करू जंगी, ___रावांची साथ लाभो, प्रत्येक वेळ प्रसंगी
तिरंगी झेंड्यावर, अशोकचक्राची खूण, ___चे नाव घेते, ___ची सून
आकाशात चमकतात, चंद्र आणि तारे, ___रावांसाठी, सोडून आले मी सारे