सासू माझी प्रेमळ, सासरे माझे हौशी, मिळून मिसळून राहतो, आनंदाने प्रत्येक दिवशी

पुरवते सगळी हौस, न करता टाइम वेस्ट, माझी सासू आहे भारी, सर्वांपेक्षा बेस्ट

बेफिकीर स्वभावाला, उर्मटपणाची जोड, बघाच कशी मोडते मी, माझ्या सुनेची खोड

सासूबाईंसाठी चहा बनवला, सोबत दिली बटर खारी, मी आहेच खूपच स्मार्ट, आणि सासू माझी लय भरी

नागपूर ते मुंबई आहे खूप अंतर, सासूबाईंनी खूप सांभाळून घेतले मला लग्नानंतर

चुलीवर ठेवले दूध, दुधात साय, ___रावांना जन्म देणारी, धन्य ती माय

दादर ते बोरिवली, स्टेशन आहेत बारा, सासूबाई बसतात आरामात, आणि मी घालते वारा

सासूबाई आणि मी मिळून घालतो घरात धुडगूस, काय करणार देवा, नशिबी सासू आली खडूस

हिमालय पर्वतावर, आहेत म्हणे बर्फाच्या राशी, सासूबाई नेहमीच म्हणतात मला, सुनबाई तू अशी ग कशी?

इंग्रजी भाषेत, गवताला म्हणतात ग्रास, सासूबाई देतात मला, लई लई त्रास