नव्या घरात शोभून दिसते, डायनिंग टेबल, माझ्या नावासमोर लागले, ___रावांच्या नावाचे लेबल
नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी, ___च्या घराण्यात, ___ रावांची झाले राणी
वाहते चहूकडे, शुभ्र हे चांदणे, ___रावांच्या घरी झाले, सुरु माझे नांदणे
लग्न झाल्यावर मुलगी होते, माहेरची पाहुणी, ___रावांच्या घराची, झाले मी गृहिणी
माहेरी साठवले, मायेचे मोती, __च नाव घेऊन, जोडते नवी नाती
गुलाबाचे फूल, मोहक आणि ताजे, __च्या येण्याने, भाग्य उजळले माझे
माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून, जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून
नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून, __चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून
बहिणीसारख्या नणंदा, भावासारखे दीर, ___रावांचे नाव घ्यायला, झाले मन अधीर
पायातल्या जोडव्यात, माहेरची स्मृती, ___ रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती