माहेरची नाती, जणू रेशमाच्या गाठी, रेशीमबंध सोडून सासरी आले, ___च्या साठी

प्रेमरूपी दिव्यात लावते, प्रीतिची वात, ___रावांचे नाव घ्यायला, केली आजपासून सुरुवात

आपला आशीर्वाद,आहे लाख मोलाचा, __रावांसोबत, संसार करेन सुखाचा

वसंतात दरवळतो, फुलांचा सुवास ___सोबत सुरु केला, मी जीवनाचा प्रवास

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, __तू फक्त, मस्त गोड हास

सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात, __ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात

नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना, मन माझे भांबावते, ___च्या साथीने नव जीवनाचे, स्वप्न मी रंगवते

नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा, __रावांसोबत, संसार करीन सुखाचा

विवाह म्हणजे सुरूवात नव्या जीवनाची, ___रावांचे नाव घेते, जाणीव ठेवत कर्तव्यांची

सासरचे निरांजन, माहेरची फुलवात, __रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात