सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, ___रावांशी लग्न करुन, सौभाग्यवती झाले
चांदीच्या ताटात वाढली, बटाट्याची भाजी, अहो आई चिंता नका करू, घेईन ___ची मी काळजी,
माझ्या स्वप्नातला, तुम्ही काजवा जणू, ___तुमचे नाव घेऊ, की रोज नुसते अहो म्हणू?
सौभाग्याचे काळे मणी, घातले आज गळा, ___रावांच्या नावाने, लावीते कपाळी लाल टीळा
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल
सौभाग्याचे अलंकार, मंगळसूत्राचे काळे मणी, ___राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी
लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर, ___ व माझ्या लग्नाला आलात, हाच आमचा आहेर
बकुळीची फुले सुकली तरी, हरवत नाही गंध, ___रावांसाठी माहेर सोडले तरी, राहतील मनात स्मृतिबंध
आई वडीलांच्या वियोगाचे, दुःख ठेवून मनात, हसतमुखाने प्रवेश केला मी, ___रावांच्या जीवनात
आरतीच्या ताटात, अगरबत्तीचा पुडा, ___रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा