चांदीच्या दिव्यात लावली, प्रेमरूपी वात, ___रावांचे नाव घेऊन करते, सहजीवनाची सुरूवात

आमच्या दोघांच्या जोडीला, आशीर्वाद तुमचा हवा, ___रावांसोबत, संसार थाटेन नवा

अक्षता पडताच, अंतरपाट होतो दूर, ___रावांमुळे सौभाग्यवती झाले, सांगतात सनईचे सूर

सगळ्या रुढी परंपरेत आहेत, विज्ञानाचे धागेदोरे, ___सह घेतले मी, सप्तपदीचे फेरे

सात जन्मांची साथ, हातामधे घेऊन हात, ___सोबत करतो, आजपासून संसाराची सुरवात

थोडीशी आपुलकी, थोडासा विश्वास, ___सोबत सुरु झाला, संसाराचा प्रवास

___च्या काठावर, सुंदर माझे गाव, ___च्या मेंदीत, लपले माझे नाव

हिरव्यागार मळ्यात, चंद्र दिसती तळ्यात, ___रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधते गळ्यात

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल, ___रावांचे नाव घेऊन, टाकते मी पहिले पाऊल

परातीत परात, चांदीची परात, ___ची लेक आली, ___च्या घरात