नव्या दिशा नव्या आशांसह, करते नव्या घरी पदार्पण, ___रावांसाठी करेन, संपूर्ण जीवन अर्पण
मराठीत आहेत, खूप सुंदर सुंदर म्हणी, ___रावांचे नाव घेते, गृहप्रवेशाच्या क्षणी
प्रेमच प्रेम असावे, नको कुणाचा द्वेष, ___रावांच्या सोबतीने, करते गृहप्रवेश
लग्न झाले, वरात झाली, आले आता दारात, ___राव तुम्ही मला, न्या की उचलून घरात
नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड, ____च नाव घेतो, आता तरी वाट सोड
रस्ता अडवायला, जमल्या सगळ्या बहिणी, ____ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी?
गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट, ____रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट
रुपेरी सागरावर, चंदेरी लाट, ___ रावांचं नाव घेते, सोडा माझी वाट
मायेने वाढवले, संस्कारांनी घडवले, __चं नाव घ्यायला, __नी अडवले
जमले आहेत सगळे, __च्या दारात, __रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात