नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले, __रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात, __रावांचे नाव घेते, __च्या दारात
शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात, __रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात
आकाशात शोभून दिसे, चंद्राची कोर, ___रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर
ते उडवतात पतंग, आणि मी पकडते फिरकी, ___रावांच्या मागे सात जन्म, अशीच घेईन मी गिरकी
काचेच्या वाटीत, फळे ठेवली कापून, ___रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून
एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती, अशीच राहू दे, माझी व ___ रावांची प्रेम ज्योती
कपाळी लावली, टिकली चंद्रकोर, ___रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर
खडी साखरेची गोडी, अन् फुलांचा सुगंध, ___ रावांच्या संसारात, मिळाला खूपच आनंद
जीवनाच्या सागरात, सप्तरंगी पूल प्रेमाचा, ___रावांच्या साथीने, संसार करीन सुखाचा