काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ___रावांचे नाव येते, थेट माझ्या हृदयातून

संध्याकाळी घरट्यात, परतती पक्षांचे थवे, ___रावांच्या नावाने, मिळाले जीवन नवे

लेक कोणाची, ___ (माहेरचे आडनाव) ची, सून कोणाची, ___ (सासरचे आडनाव) ची, राणी कोणाची, ___ (पतीचे नाव) रावांची

पाच वर्षांचा संसार, पण प्रत्येक दिवस गोड, तिन्ही सांजेला मनाला लागे, ___रावांची ओढ

चंद्र मराठीत, चाँद हिंदीत, इंग्रजीत म्हणतात मून, ___रावांचे नाव घेते, मी ___ ची सून

सागवानी पेटीला, सोन्याची चूक, ___रावांच्या हातात नेहमी, कायद्याचे बुक

सुखदुःखाच्या धाग्यांनी, जीवन वस्त्र विणले, ___रावांच्या सहवासाचे, भाग्य मला लाभले

कोल्हापूर म्हणजे, छत्रपती शाहू महाराजांचे स्थान, ___रावांचे नाव घेताना, वाटतो मला अभिमान

पुणेरी पाट्यांना, नाही कोणाची तोड, मी मुंबईची आहे पण मला, ___ पुणेकरांची लागली ओढ

सोन्याच्या ताटात, खडीसाखरेची वाटी, ___रावांची लाभो साथ, सात जन्मांसाठी