पोर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजरा, ___रावांनी आणला मला, मोगऱ्याचा गजरा

सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा, ___रावांमुळे लागला, मला त्याचा लळा

जे जे स्वप्न बघितले, ते आज मिळाले, संसार काय असतो, हे ___मुळे कळले

आदेश भाऊंचा कार्यक्रम, आहे होम मिनिस्टर, ___ चे नाव घेते, करून मॅरेज रजिस्टर

सुंदर राजहंस, शोभा देतो वनाला, ___रावांचे नाव घेताना, आनंद होतो मनाला 

जीवनरूपी काव्य, दोघांनी मिळून वाचावे, ___रावांच्या प्रेमाचे भाग्य, मला जन्मोजन्मी लाभावे

पौर्णिमेच्या दिवशी, चंद्र उगवला ढगात, तुमच्या आशीर्वादाच्या छायेत, ___रावांची किर्ती पसरो जगात

अधिकमासात आईने दिली, चांदीची कळशी, ___रावांचे नाव घेते, ___पूजेच्या दिवशी

वटपौर्णिमेला भरते, सुवासिनींची ओटी, ___रावांचे नाव, सदा माझ्या ओठी

सासू-सासऱ्यांनी, डोहाळे जेवण केले माझे झोकात, ____ रावांचे नाव घेते, कार्यक्रम झाला थाटात