काळोखी रात्र संपली, धावत आली उषा, ___च्या सहवासात, प्रीतीची चढली नशा

वेरुळची शिल्पे, आहेत अप्रतिम सुंदर, ___आहे माझी, सर्वात सुंदर

पेटी वाजे तबला वाजे, मंजुळ वाजे बासरी, ___च्या रूपाने सप्तसुरांना, साथ मिळाली हसरी

तुझ्या येण्याने आयुष्यात, भरले अनंत रंग, ___सोबत संसारात, झालो मी दंग

स्थळं आली होती खूप, पण थांबलो होतो तुझ्या होकारासाठी, ___सोबत अखेर जुळल्या, माझ्या रेशीमगाठी

अथांग सागरात, संथ चालते होडी, परमेश्वर सुखी ठेवो, ___नी माझी जोडी

जुईची वेणी, जाईचा गजरा, ___वरती, सगळ्यांच्या नजरा

फुलांइतकीच सुंदर दिसते, गुलाबाची कळी, हसल्यावर ___च्या गालावर, दिसते सुंदर खळी

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, ____रावांचे नाव घेते, ____च्या घरात

शेतात राबती, बैलांची जोडी, धनधान्याने भरलेली राहो, ___रावांची माडी