घरातील सर्वांवरच, अथांग तुमची माया, आयुष्यभर घरच्यांसाठी, ___नी झिजवली काया
___ची सून म्हणून घरात आले, पण सासूबाईंनी तर मला त्यांची लेकच केले
सासू सुनेच्या भांडणात नवऱ्या मुलाची होते दैना, आणि सासू नाही भांडली तर, मला चैन च पडेना
वडिलांची माया, आणि आईची कुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
कुबेराच्या भांडारात, हिरे-माणकांच्या राशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
जमले सगळी नातीगोती, आमच्या या घरात, ___रावांचे नाव घेते, आनंदाच्या भरात
दारी बांधले, आंब्याच्या पानांचे तोरण, ___रावांचे नाव घेते, ___पूजेचे कारण
वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा, ___रावांसह मला, आपला आशीर्वाद हवा
आम्रवृक्षाच्या छायेत, कोकिळा करते गुंजन, ___सोबत करतो मी, ___ चे पूजन
अश्विन शुद्ध प्रतिपदेला, बसतात देवीचे घट, ___करते, सगळी कामे एकदम पटापट