खडीसाखरेचा खडा, खावा तेव्हा गोड, ___च्या रूपात, नाही कुठे खोड
नावामध्ये आहे काय? नका हट्ट धरू, माझा उखाणा जुळत नाही, ___काय ग करू
पुण्याहून धडक, आली डेक्कन क्वीन, ___झाली, माझी साताजन्माची क्वीन
झुळूझुळू पाण्यात चाले, हळूहळू होडी, शोभून दिसते ___आणि माझी जोडी
फुलात फूल, गुलाबाचे फूल, संसार करु सुखाचा, ___, मी आणि एक मूल
जीवनाच्या प्रवासात, सुख-दुःखाचा ऊनपाऊस, ___ला आहे, शॉपिंग ची खूपच हौस
___च्या घाटातून जाताना दिसते, मनोहारी दृश्य, मन हरपणारं किती गोड असं, ___ च आहे हास्य
चांगली बायको मिळावी म्हणून, फिरलो गल्ली ते दिल्ली, पण ____कडेच होती, माझ्या हृदयाची किल्ली
अलिबाबाने गुहा उघडली, म्हणून खुल जा सिम सिम, ____ चं नाव घेताच पडतो, मनी पाऊस रिमझिम
असते नेहमी हसतमुख, बोलणे आहे गोड, ___च्या प्रीतीसाठी, मन घेते ओढ