जेवणात हवे दही, साखर, तूप, ____ मला आवडते खूप
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात, __ भरली, माझ्या मनात
कोकणच्या माणसांत, हापूस आंब्याची गोडी, ____आणि माझी, लक्ष्मी-नारायणाची जोडी
कॉलेज मध्ये असताना, फिरवल्या कित्ती पोरी, आणि शेवटी नशिबी पडली, गाव की ही गोरी
तलावात उगवले, सुंदर कमळ, ___माझी, आहे खूपच प्रेमळ
इंजिनीअर बनायला, लागले खूपच कष्ट, ___च नाव घेतो, सर्वांपुढे स्पष्ट
समुद्राचे पाणी, लागते खूप खारे, ___साठी तोडून आणेन, मी आकाशातील तारे
सोन्याची बरणी, भरली तुपाने, सुख आले घरात, ___च्या रूपाने
मी नव्हते सुंदर, तरीही मला निवडले, ___रावांचे हेच रूप, मला फार आवडले
चटणीला दिला तडका, जिरे-मोहरीचा, ___राव आहेत जणू, हिरा कोहिनूरचा